शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा संतोषभाऊ सोमवंशी यांनी केला सत्कार
लातूर : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी मशाल भेट देवून सत्कार केला. शिवसेना पक्षाला मशाल चिन्ह भेटल्यावर पहिल्यांदा भेट घेत औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व विषयांवर चर्चा केली.गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिले. शिवसेनेचा औसा विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ भाजपाला दिल्याने लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचा एकमेव हक्काचा मतदारसंघही गेला. त्यानंतर राज्यात राजकीय समीकरण बदलत गेले.शिवसेनेचा हा औसा विधानसभा मतदारसंघ व या भागातील पदाधिकारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहिले. पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी औसा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाली. संघटनात्मक बाबींसह आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीविषयीही चर्चा झाली.
टिप्पणी पोस्ट करा