"निर्भय आम्ही सक्षम आम्ही" या उपक्रमाचे उद्घाटन
लातूर प्रतिनिधी -नारी प्रबोधन मंच ,लातूर व शासकीय महिला तंत्रनिकेतन ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "निर्भय आम्ही सक्षम आम्ही" या उपक्रमाचे उद् घाटन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजीत आवळे सर, नारी प्रबोधन च्या अध्यक्ष सुमती जगताप मॅडम, सचिव डॉ कुसुमताई मोरे, सहसचिव प्रा. नयन राजमाने, सदस्य शोभा वारद मॅडम, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुधीर साळुंखे, प्रा. काकडे, प्रा.अनघा गाडवे यांची मंचावर उपस्थिती होती.दि.26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सार्वजनिक संविधान वाचन करण्यात आले. त्याचबरोबर 26 /11 दहशतवादी हल्ला मुंबई येथे झाला या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक, पोलीस, अधिकारी यांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच 'अब्राहम लिंकन यांचे मुख्याध्यापकांना पत्र' महाविद्यालयस भेट देण्यात आले.
याप्रसंगी प्रा. डॉ. कुसुमताई मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की मन, मनगट व मेंदू यांचा योग्य वापर केला पाहिजे. वाद, संवाद व सुसंवाद याच्यातील फरक लक्षात घेऊन वागले पाहिजे. आपण समाजात वावरताना व कॉलेजमध्ये असताना कोणती काळजी घ्यावी. प्रेमामध्ये घातपात जास्त प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे अशाप्रकारे वेळीच सावध राहायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
प्रा. नयन राजमाने मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतः चा विकास केला पाहिजे. स्वत:ला अगोदर आहे असे स्विकारले पाहिजे तर आपण यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो,असे त्या म्हणाल्या.तसेच अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकातील प्रसंग सांगून कशाप्रकारे आपल्या मानसिक तणावातून आपण बाहेर पडले पाहिजे व सकारात्मकतेने पुढे गेले पाहिजे, नकाराचा अधिकार स्रियांनी वापरला पाहिजे.तसेच त्यांनी विद्यार्थिंनीं सोबत त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणी व समस्यावर संवाद साधत विद्यार्थिनींना बोलते केले.शोभा वारद मॅडम यांनी मुलींच्या शिक्षणाबद्दल तसेच स्त्री-पुरुष समानतेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुमतीताई जगताप मॅडम यांनी मुलीं सोबत संवाद साधताना सांगितले की पुन्हा एकदा प्रत्येक मुलीमध्ये झाशीची राणी ,आई जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, तयार झाल्या पाहिजेत. प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन निर्भय आणि सक्षम झाले पाहिजे.संस्थेच्या कार्यातील अनेक उदाहरणे देत विद्यार्थिनींना त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पठाण सबा यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य इंद्रजीत आवळे सर यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना सांगितले की असे प्रबोधनाचे उपक्रम वेळोवेळी आमच्या महाविद्यालयात घेण्यात यावे. तसेच नारी प्रबोधन मंचचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य इंद्रजीत जी आवळे सर प्रा. सुधीर साळुंखे सर, काकडे सर (HOD) ,प्रा.बी.पि कदम,प्रा.शीतल कांगणे मॅडम, व इतर प्राध्यापक वर्ग व कर्मचारी, उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.तसेच नारी प्रबोधन मंचचे कार्यकर्ते विकास पवार, विशाल धनवडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा हदडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कल्याणी राऊत यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा