न घाबरता नेत्र तपासणी करूनच घ्यावी-बालिकाताई मुळे

न घाबरता नेत्र तपासणी करूनच घ्यावी-बालिकाताई मुळे 











लातूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील  अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड येथे शिक्षक महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया लातूर जिल्हा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष  बालिकाताई मुळे या बोलत होत्या,यावेळी त्या म्हणाल्या कि आमच्या वतीने व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने वेळोवेळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.असे यावेळी सुध्दा आयोजन करण्यात आले या शिबिरात आपण सर्वांनी आपले नेत्र तपासणी करूनच घ्यावी.या शिबिरात ज्यांचे नेत्र हे मोतिबिंदू करण्यात येतील त्यांनाच दवाखान्यात मोफत उपचार केला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी गणपतराव भंडारे, चेअरमन रामकिशन शिंदे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अजितसिंह जमादार, रूपाताई जमादार, डॉ. सचिन निलंगेकर व  बाबासाहेब शिंदे, सौदागर सद्दाम, गुरमे प्रकाश, डॉ.प्रशांत गायकवाड आदी मान्यवर व गावकरी मंडळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये तब्बल २५० नागरिकांची तपासणी करण्यांत आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने