बेवनाळे यांच्या ऐतिहासिक नाण्याच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद

बेवनाळे यांच्या ऐतिहासिक नाण्याच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद








लातूर प्रतिनिधी- डाक, जी.पी.ओ.(मुख्य पोष्ट आॅफीस) नागपूर व छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने युनिक कलेक्शन आणि कला प्रदर्शनी चे प्रदर्शन राजहंस सभागृह मुख्य पोष्ट अॉफीस नागपूर मध्ये  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व पंडित जवाहरलाल नेहरू जयंती(बालदिन) निमित्त दि 14,15 नोव्हेंबर 22 दोन दिवस आयोजित करण्यात आले होते .या प्रदर्शनात
चा समारोपीय भव्य दिव्य सन्मान सोहळा संपन्न झाला.यावेळी सौ. रेखा रिझवीजी सहा.जनरल पोष्ट मास्टर नागपूर व दिलीप डहाके अध्यक्ष छंदसम्राट बहूद्देशीय संस्था नागपूर, सुनील रेड्डी उपाध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनात  बेवनाळे सौदागर सर ऐतिहासिक नाणी संग्राहक अभ्यासक निलंगा यांना सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी छंदसम्राटचे गणेश डुमरे व सहकारी, पोष्ट आॅफीस स्टाफ व मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने