लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणासाठी आंबेडकरी जनतेचा मनपा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा !
लातूर ः लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण करण्यासाठी लातूर मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. या निमित्त आज दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी आंबेडकर पार्क येथे बैठक घेण्यात आली, यावेळी अनेक शहरातील सामाजीक संघटनेचे पदाधीकारी व कार्यकर्ते, व पत्रकार ही उपस्थित होते. यात साधू भाऊ गायकवाड, दिलीप नवगीरे, अक्षय धावारे, बबलू गवळी, महेश गुंड, विलास चक्रे, आदर्श उपाध्ये, शंकर नाग भुजंगे, गोविंद कांबळे, नाना कांबळे, पत्रकार नितिन भाले, पत्रकार अशोक हनवते, रघुनाथ बनसोडे, पत्रकार अमोल इंगळे, याच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करणेची आंबेडकरी जनतेची मागणी असली तरी मनपा प्रशासन हे चालढकल करीत असल्याने माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे यानी जनतेशी माध्यम संवादातून लक्ष वेधले होते. म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पूतळ्याच्या मध्यभागी असलेले शौचालय हटवावे यासह डॉ. आंबेडकर पार्क येथील खूर्चीस्थित बाबासाहेबाच्या पूतळ्याचा प्रश्न असो यावर त्यात झोत टाकला होता. पंरतू मनपा प्रशासन लक्ष्य देत नसल्याने बाकी कांहीही असो डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुशोभिकरण करा अन्यथा लातूर महानगर पालीकेला आंबेडकरी जनतेच्या वतीने ताळा ठोको आंदोलन 28 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात येईल असा इशारा ही समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे डॉ. आंबेडकर पार्क सुशोभीकरणासाठी मनपा प्रशासनाने निधी मंजूर केला असला तरी त्याचा विनियोग न करता आंबेडकर पार्क हे मनपा प्रशासन महसूलासाठी व्यापारी संकूला प्रमाणे वापर करीत असल्याने आंबेडकर जनतेत तिव्र संताप व्यक्त होत असल्यानेच आंबेडकरी चळवळीतील नेत्यानी एकत्र येवून डॉ. आंबेडकर पार्क येथील बैठकीत 28 नोव्हेंबर पूर्वीचे सुशोभीकरण करावे अन्यथा 28 नोव्हेबर रेाजीच लातूर महानगरपालीकेला कूलूप लावून ताळा ठोक आंदोलन करणार असल्याची निर्वाणीचा इशारा देण्यात आला असून या संदर्भात राजकीय वर्तूळात कुजबूज होताना दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा