विज बिल बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवण्यात यावी-मनसे

विज बिल बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवण्यात यावी-मनसे






औसा प्रतिनिधी तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात महावितरण शेतकऱ्याच्या शेतातील शेती पंपाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पुर्वी सूचना न देता तोडत आहे.ऐन रब्बी हंगामात महावितरण शेतकऱ्यांना वेठीस धरत असून ही होत असलेली बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, तोडण्यात आलेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करून यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचारी व अधिका-यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आसूडाचा महाप्रसाद देण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे किल्लारी शाखेचे उपअभियंता खामगल यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे औसा विधानसभा संघटक महेश बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार,तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, तालुका उपाध्यक्ष किशोर आगलावे,विशाल उस्तूरे,अनिल कांबळे,बाळू लिंबाळे,बाबा कांबळे,संदीप उत्तरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने