पूर्व मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत करावी-प्रदेश सचिव सुलेमान शेख






पूर्व मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पूर्ववत करावी-प्रदेश सचिव सुलेमान शेख





औसा प्रतिनिधी -1 ली ते 8 वी पूर्व मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने बंद केली आहे म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख यांच्या नेतृत्वात  औशात
आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमांतर्गत पहिली ते आठवी पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिली जात होते.आरटीई 2009 मध्ये हे शिष्यवृत्ती केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली होती. ती आता या सरकारमध्ये शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. तरी शिष्यवृत्ती पूर्ववत करावी. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. औसा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आले.या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सय्यद मुस्तफा वकील इनामदार व लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी औसा तालुक्यातील सर्व विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने