जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत रेशीम उद्योगविषयी प्रशिक्षण

जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत

 रेशीम उद्योगविषयी प्रशिक्षण



लातूर :  जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत औसा तालुक्यातील करजगाव येथे विविध गावातील 40 शेतकऱ्यांना रेशीम कोश उत्पादन काढण्याबाबत पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. तानाजी पंडित जाधव यांच्या तुती लागवड शेतीमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, वरिष्ठ क्षेत्र सहायक सी. एस. पाटील, मनरेगा तांत्रिक सहायक आर. एन. देशमुख यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तांबारवाडी, जावळी, करजगाव, नांदुर्गा, गौडगाव, केळगाव येथील शेतकरी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते.

करजगाव येथील श्री. जाधव दोन एकरवरील रेशीम उद्योगातून एका शेडमध्ये वर्षाकाठी आठ ते दहा पिके घेतात. त्यापासून त्यांना जवळपास सात लाखांचे उत्पादन मिळते. या गावात मागील पाच वर्षापासून आठ शेतकरी रेशीम उद्योग करत असून सर्वांचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे. यावर्षीही करजगावमध्ये नवीन दहा शेतकऱ्यांनी रेशीम व्यवसाय सुरू केला आहे.

श्री. वराट म्हणाले, सध्या रेशीम कोशाचे दर प्रति क्विंटल 60 ते 70 हजार रुपये आहेत. मनरेगा अंतर्गत एक एकर रेशीम उद्योग करण्यासाठी तीन वर्षाकरिता 3 लाख 42 हजार 900 रुपये अनुदान दिले जाते. रेशीम उद्योग कमी पाण्यावर होत असून एक महिन्यांमध्ये कोश विक्री करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने