विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गतमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम


विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम



लातूर - भारत निवडणूक आयोग व मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार  1 जानेवारी2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्‍यानुसार 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम राबविली जाणार असून मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहतील.

           विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांना सुलभतेने मतदार नोंदणी करता यावी, यासाठी 19 आणि 20 नोव्हेंबर 2022, तसेच 3 आणि 4 डिसेंबर 2022 रोजी मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. 1 जानेवारी 2023 रोजी ज्यांचे वय 18 किंवा त्‍यापेक्षा अधिक आहेअशा नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज नमुना क्र. 6 भरावा. तसेच सोबत जन्मतारखेचा पुरावारहिवासी पुरावा आणि रंगीत छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.

          मतदार यादीतील नावात दुरुस्‍ती किंवा ठिकाणपत्‍ता बदलछायाचित्र बदलणे किंवा दुसरे ओळखपत्र हवे असल्यास अर्ज नमुना क्र. 8 भरून दुरुस्ती करावयाच्या तपशीलाशी संबंधित पुरावा जोडावा. मयतदुबार अथवा कायम स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी अर्ज नमुना क्र. 7 भरावा. सोबत मयत मतदाराचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे. तसेच स्थलांतरीत मतदाराचे सध्या राहत असलेल्या वास्तव्याचा पुरावा जोडावा. मतदार यादीसोबत आधार जोडणी करण्यासाठी अर्ज नमुना क्र. 6 ब भरून आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.

मतदार नोंदणीमतदार यादीसोबत आधार क्रमांक जोडणीदुबार अथवा मयतकायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणेमतदार यादीतील तपशील बदलण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज 8 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन स्‍वरुपात www.nvsp.in या संकेतस्‍थळावर किंवा Voter Helpline App च्‍या माध्‍यमातून सादर करावे.

          मतदार यादीतील त्रृटी टाळून अर्जांचे संगणीकरण सोयीचे होण्‍यासाठी मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे. या सुविधांचा जास्‍तीत जास्‍त वापर करून प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन लातूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अविनाश कांबळेलातूरचे तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने