सरपंचांना आधुनिक व सेंद्रिय शेती प्रशिक्षण
लातूर:-राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२२-२३अंतर्गत ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन व यशदा पुणे यांच्या वतीने आयोजित लातूर येथे प्रशिक्षण चालु आहे. जिल्ह्यातील तीस सरपंचांच्या तीन दिवशीय प्रशिक्षणात, दिनांक २९नोव्हेंबर रोजी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व शेतीपूरक उद्योग यावर संजय येंगारे व नागेश राठोड यांनी सखोल मार्गदर्शन केले.दुपार सत्रात कृषी आधुनिकीकरण माहिती अन्तर्गत गरुडा ड्रोन व त्याचा प्रत्यक्ष शेतीत फवारणीसाठी वापर
यावर सप्रयोग मार्गदर्शन झाले.कृषी विज्ञान केन्द्र लातुर यांनी या कामी मदत व मार्गदर्शन केले.या विशेष कार्यक्रमांचे प्रास्ताविक नीता मगर यांनी केले तर आभारप्रदर्शन यशदा पुणे चे प्रविण प्रशिक्षक कमलाकर सावंत यांनी केले.सदरील प्रशिक्षण सर्वोत्तम झाल्याचे शिवराज बिडवे सरपंच मुरुड अकोला तालुका लातूर यांनी समारोपात मांडले.
टिप्पणी पोस्ट करा