साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कृषिरत्न संजिव माने, योगाचार्य डॉ प्रज्ञा पाटील, सुनिल बेळगावें, सौ स्मिता बेळगावें आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने केले तर कार्यक्रमांचा शेवट २६.११च्या हल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमांचे निवेदन यांनी केले तर आभार यांनी केले आहे.
अँड प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे हे विद्यार्थी अवस्थेपासुन सामाजिक ,महीला, बालविकास कल्याण, सामाजिक, राष्ट्रीय सदभावना क्षेत्रात कार्यरत आहेत. लातूर जिल्हयातील सामाजिक चळवळीतील युवकातील नाव म्हणजे अँड प्रदिपसिंह गंगणे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते वीर भगतसिंह विद्यार्थी गौरव पुरस्कार, अखिल भारतीय छावा संघटनेचा सामाजिक पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,डॉ सौ चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील पुरस्कार, मुंबई संध्या परिवाराचा सेवादिप पुरस्कार, मुंबई जनगौरव कार्यदर्पण आयकॉन पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अँड प्रदिपसिंह गंगणे यांचे अभिनंदन माजी राज्यमंत्री आ संजय बनसोडे, माजी आ वैजनाथ शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ व्यकटराव बेंद्रे, प्रा डॉ बी व्हीं मोतीपवळे, मकरंद सावे, इंजिनियर सागर भागवत,सिनेट सदस्य धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर, अँड सुहास बेंद्रे, प्रा एकनाथ पाटील,जमाल्लोद्दीन मणियार, बालाजीअप्पा पिंपळे,अँड अमितकुमार कोथमिरे, डॉ विशाल मैदरकर, सुनिल कांबळे,डॉ अंबादास कारेपुरकर, संतोष मस्के, रामभाऊ जवळगेकर, अँड अभिजित मगर, सुशिलसिंह चौहाण, आनंद पारसेवार,सुनिल दुरुगकर आदींनी कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा