कराटे व योगा स्पर्धेत अनुराग, योगीता यांचे घवघवीत यश

कराटे व योगा स्पर्धेत अनुराग, योगीता यांचे घवघवीत यश 




औसा प्रतिनिधी-श्री रामनाथ विद्यालय आलमला ता.औसा येथे झालेल्या तालुका स्तरीय  कराटे स्पर्धेत , योगासने स्पर्धेत मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथील इयत्ता 9 वीतील कु. सावंत योगीता नेताजी वयोगट 17,याच शाळेतील इयत्ता सातवीतील चि. सावंत अनुराग नेताजी  14 वर्ष वयोगटातून कराटे स्पर्धेत व योगासने स्पर्धेत  या बहीण भावाने प्रथम क्रमांक पटकावून कराटे असोशियन औसा व मुक्तेश्वर शाळेच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवले आहेत. याबद्दल कराटे प्रशिक्षक अजित ढोले , शाळेचे मुख्याध्यापक  जलसकरे , रवीशंकर राचट्टे,शिवलिंगअप्पा औटी,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहीण - भावाचे अभिनंदन व कौतुक करीत आहेत. तसेच सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने