महात्मा बसवेश्वरच्या दोन खेळाडूंना राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत तृतीय पदक


महात्मा बसवेश्वरच्या दोन खेळाडूंना राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत तृतीय पदक

लातूर प्रतिनिधी - धुळे येथे संपन्न झालेल्या ४९वी राज्यस्तरीय सब-ज्युनिअर व कॅडेट ज्यूदो स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून ६० कि. वजन गटात श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आकाश खड्डे याचा तृतीय क्रमांक आला तसेच ७२ कि. वजन गटात शंकर कतलाकुटे याचा तृतीय क्रमांक आला आहे. महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील दोन खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचा महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक ॲड.श्रीकांत उटगे आणि स्वीकृत संचालक अशोक उपासे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व पदक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कररेड्डी, प्रा.आशिष क्षीरसागर, मधुकर निकूंबे आणि विष्णू तातपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कररेड्डी, डॉ.गुणवंत बिरादार, प्रा.आशिष क्षीरसागर आणि विष्णू तातपुरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.या सर्व विजय खेळाडूंचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि सर्व संचालक, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने