जिपप्राशा हसलगणच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

जिपप्राशा हसलगणच्या शिष्यवृत्ती पात्र  विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

औसा प्रतिनिधी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसलगण ता.औसा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले बद्दल शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . इयत्ता पाचवी चे सतरा   विद्यार्थी व आठवीचे तीन विद्यार्थी पात्र यामध्ये लक्ष्मी खंडु भालेकर,समर्थ गणपती फुलसुंदर,चैतन्य महेशंकर वाडीकर,समर्थ शरद व्हंडे,रोहिणी बालाजी कदम, ओंकार अनिल मोरे,पुजा सतिश फुलसुंदर,मानवी सुनील मोरे,श्रुती गोविंद काळी,सृष्टी जयप्रकाश वाडीकर ,श्रेया नागनाथ सोमवंशी,ओम महादेव मोरे,आकांक्षा मनोज मोरे,विश्वजीत गोविंद फुलसुंदर,कुसुम सोमनाथ वाघमारे,सुमित विकास मोरे,प्रशांत राजेंद्र मोरे, सिद्धी महादेव मोरे,प्रणाली बबन मोरे,प्रविण खंडु कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसलगण शाळेतील एकूण वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  चव्हाण सर यांचा तसेच शिष्यवृत्ती विभाग प्रमुख  डाके सर, व विषय शिक्षक  पांचाळ सर (मराठी),  झाडे सर (गणित)  जाधवर सर ( इंग्रजी) यांचा देखील सन्मान करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने