स्पर्शच्या विद्यार्थ्याचे अबॅकस स्पर्धेत सुयश

स्पर्शच्या विद्यार्थ्याचे अबॅकस स्पर्धेत सुयश









औसा /प्रतिनिधी : - लोर अकॅडमी इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोर अकॅडमी स्पर्धेत ' स्पर्श ' इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.यावेळी संस्थेचे संचालक पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. सदर स्पर्धा विद्यार्थांच्या कौशल विकासासाठी मुलांची गती, अचूकता आणि आत्मविशवास वाढवण्यासाठी घेण्यात आली. या अभ्यासाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मदत व  स्पर्धात्मक परीक्षा घेतली. तसेच या सर्व गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासात होतो. यासाठी ही स्पर्धा लोर अकॅडमीच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेत ' स्पर्श ' इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी  सबुर शाकेर शेख आणि हर्षद सुनील अपसिंगेकर या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होवून यश संपादित केले आहे. शेख सबुर या विद्यार्थीस अबॅकस या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहे, तर हर्षद सुनील अपसिंगेकरने फोनिक्स या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याब्दल ' स्पर्श ' इंग्लिश स्कूलच्या वतीने या दोन विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे संस्थापक सुलतान शेख व मोईज शेख यांनी या दोन विद्यार्थ्यास शाल, श्रीफळ देवून सत्कार करत अभिनंदन केले. या प्रसंगी  शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद मॅडम व शाळेचे कर्मचारी, स्टाफ व विद्यार्थ्यांचे आई, वडील यावेळी  विद्यार्थ्याचे कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने