वनऔषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा-सौ. अदिती अमित देशमुख
लातूर (प्रतिनिधी): ट्वेन्टीवन ॲग्री लि., व आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून लातूर तालुक्यात प्रायोगीक तत्वावर यशस्वी ठरलेली सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना यावर्षी लातूर जिल्हयातील ५०० एकर क्षेत्रावर अश्वगंधा लागवड योजना राबविण्यात येणार आहे. लातूर तालुक्यात राबविलेली ही योजना आता जिल्हातील सर्वच तालुक्यात राबविण्यात येणार असून या योजनेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन, ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.लातूर तालुक्यातील बाभळगाव व निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे यावर्षीच्या हंगामातील अश्वगंधा लागवडीचा शुभारंभ ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.ट्वेन्टीवन ॲग्री लि., व आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून लातूर तालुक्यात प्रायोगीक तत्वावर गत दोन वर्षापासून अश्वगंधा लागवड योजना राबविण्यात आली या योजनेत महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा,कव्हा, जमालपूर येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना अश्वगंधा लागवड ते काढणी पर्यंतचे तज्ज्ञानी मार्गदर्शन केले, लागवडीसाठी १५ ते २० हजार रूपये खर्च आला, प्रतिकीलो २३० रूपये प्रमाणे अश्वगंधा खेरदीची हमी देण्यात आली. या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.अश्वगंधा औषधी वनस्पती लागवड यशस्वी ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या पुढाकारतून सन २०२० मध्ये अश्वगंधा शेतीची प्रायोगिक तत्वावर लातूर तालुक्यात लागवड करण्यात आली. येथील वातावरण,भोगोलीक परिस्थितीत अश्वगंधा पिक यशस्वीपणे घेता येते हे प्रायोगिकरीत्या समजल्या नंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२१ मध्ये ३५० एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत ३०० एकर क्षेत्रावर अश्वगंधाची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सहभाग आणि प्रयत्नामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. लातूर जिल्हयात वनस्पती लागवडसाठी पूढाकार लातूर जिल्हयातील भागोलीक परिस्थिती, वातावरण, पर्जन्य, शेतकऱ्यांचे कौशल्य अश्वगंधा लागवडीसह सेंद्रिय शेती, सुगंधी व औषधी वनस्पतीच्या लागवडीस अनुकूल आहे. या योजनेअंतर्गत त्या त्या तालुक्यातील वातावरण आणि शेतकऱ्यांची मागणी प्रमाणे अश्वगंधा सोबत भविष्यात लेमनग्रास, कालमेघ,शतावरी, हळद, सर्पगंधा, खस, अमरूजा, जिरेनियम, तुळस वनस्पतीची लागवड योजना राबविण्यात येणार आहे. औषधी वनस्पतींना कमी पाणी व कमी मेहनत लागते. सोयाबीन व हरभरा
पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकांची लागवड करणे फायदेशीर आहे. तसेच नवीन लागवड होणाऱ्या उसामध्येही यातील काही वनस्पतीची आंतरपीक म्हणून लागवड करता येते.सुगंधी व औषधी वनस्पतीच्या लागवडीस येथे चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी अश्वागंधा लागवड योजना राबविण्यात आली. हीच योजना आता ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून
जिल्हयातील इतर तालुक्यात राबविण्यात येणार आहे असे ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी सांगितले.आयुर्वेद वनस्पती योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे, या योजनेत सहभाग घ्यायचा असल्यास किंवा अधिकमाहितीसाठी धनंजय राऊत 9260000083, दत्ता वाघमारे 9604300021 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा