बीएस्सी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागातून विद्यापीठात कॉक्सिटचेच तिन्ही विद्यार्थी

बीएस्सी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागातून विद्यापीठात कॉक्सिटचेच तिन्ही विद्यार्थी
 लातूर- नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेच्या निकालात येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या बीएस्सी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत पहिले तिन्ही विद्यार्थी कॉक्सिटचेच आले आहेत.
 विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या या उन्हाळी - २०२२ परीक्षेत कॉक्सिट महाविद्यालयाच्या बीएस्सी सॉफ्टवेअर विभागातून तृतीय वर्षातील प्रवीण श्यामसुंदर बिराजदार या विद्यार्थ्याने ९०.८९ टक्के गुण मिळवत तो विद्यापीठात सर्वप्रथम आला आहे. तोच विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. कॉक्सिटचीच अमृता रामभाऊ नेमाने या विद्यार्थिनीने ९०.१४ टक्के गुण मिळवत ती विद्यापीठात द्वितीय आली आहे. तर विशाल हंसराज खंडागळे याने ९०.०३ टक्के गुण घेत तो विद्यापीठात तृतीय आला आहे. विशेष म्हणजे या पदवीचा निकाल येण्यापूर्वीच या तिन्ही विद्यार्थ्यांना नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये उच्च पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या आहेत. सुवर्ण पदक पटकावलेला प्रवीण बिरादार हा टीसीएस या आयटी कंपनीत नोकरी करीत आहे. द्वितीय आलेली अमृता नेमाने ही विप्रो या आयटी कंपनीत नोकरीवर आहे. तर विशाल खंडागळे याला विप्रो, टीसीएस व कॅपजेमिनी या तीन आयटी कंपन्यांकडून नोकरीवर येण्याची निमंत्रणे आली आहेत.
 विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, सॉफ्टवेअर विभाग प्रमुख प्रा. बी. एम. सोनटक्के यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने