वैश्य नागरी बँकेतर्फे सभासदांना चांदीचे नाणे


वैश्य नागरी बँकेतर्फे सभासदांना चांदीचे नाणे

लातूर, प्रतिनिधी-वैश्य नागरी सहकारी बँक लिमिटेड,  परभणी द्वारा बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्ह्यातील सभासदांना चांदीचे नाणे वाटप करण्यात आले.
बँकेच्या नुकत्याच लातूर येथील शाखेत झालेल्या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष सुधाकर चिद्रवार ,संचालक नंदकुमार चिद्रवार,जीवन पत्तेवार तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास देशपांडे,  यांच्या हस्ते नाणे वितरण करण्यात आले.

यावेळी स्थानिक समितीचे अध्यक्ष शशिकांत कोटलवार ,शाम कोटलवार,  सोमनाथ बोरलेपवार, नंदकुमार चिंतलवारशाखा व्यवस्थापक संतोष गेजगे व बँकेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने