जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्तलातुरात हॅप्पी म्युझिक शोचे आयोजन


जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त
लातुरात हॅप्पी म्युझिक शोचे आयोजन




 लातूर- हासेगाव येथील एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलांनी तयार केलेल्या ‘सेवालय म्युझिक शो’ ला कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा नव्याने सुरूवात होत आहे. जागतिक एड्स निर्मूलनदिनानिमित्त गुरुवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता येथील दयानंद सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत याच्या महिल्या शोचे आयोजन करण्यात आले आहे.
 ‘सेवालय म्युझिक शो’ हा आता केवळ म्युझिक शो राहिलेला नाही, एचआयव्ही संक्रमित बालकांची ती यशोगाथा बनली आहे. जन्मापासूनच मृत्युच्या छायेत वावरणारी मुले किती उत्तम कलाविष्कार दाखवू शकतात, आनंददायी जीवन जगू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या शोची सुरुवात पुण्याच्या बालगर्ंधव येथून झाली. अनेकांनी हा कार्यक्रम बघून जगण्याची नवी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले आहे.महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात या राज्यात ‘सेवालय म्युझिक शो’ चे कार्यक्रम झालेत. ‘चला हवा येऊ द्या’ मध्येही याचा शो करण्यात आला आहे. आजपर्यंत ९६ कार्यक्रम झाले आहेत.यातून मिळालेल्या निधीतूनच हॅप्पी इंडियन व्हिलेजची उभारणी व विकास झाला आहे. एका म्युझिक शोच्या माध्यमातून किती प्रेरणादायी काम उभे केले जाऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. मात्र याला कोरोनाने दोन वर्षे खंड पडला. आता कोरोनाचा धोका टळला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यामुळे नव्या उत्साहाने ‘सेवालय म्युझिक शो’ चे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. गुरुवार, १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स निर्मूलनदिनी येथील दयानंद सभागृहात सायंकाळी ६. ३० वाजता या शोचे आयोजन करण्यात आले आहे. सेवालयाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहून, सेवालयाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सेवालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने