“महात्मा बसवेश्वरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथनाट्यास भातांगळी ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद”
लातूर प्रतिनिधी - श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालय शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजकार्य विभाग), लातूर, सेंटर फॉर सोशल अंड बिव्हेवियर चेंज कमुनिकेशन, युनिसेफ आणि महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये सक्षम युवा शक्ती अभियानाच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील भातांगळी येथे बालविवाह निर्मूलन पथनाट्य सादर करण्याचत आले याला भातांगळी ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे पथनाट्य महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, युनिसेफचे जिल्हा समन्वयक विकास कांबळे आणि रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन केले.
यामध्ये पांचाळ पद्मजा (आशा कार्यकर्ती), देडे खंडू (मुलीच्या वडिलाचा मिञ), शिवानी जाधव (मुख्य सूत्रधार), चिंचकर आरती (नवरदेवाची आई), वाघमारे प्रथमेश (नवरदेव), गवळी श्रीराम (नवरदेवाचा मिञ), कुसमाडे आकाश (नवरदेवाचे वडील), गोरे वैभव (नवरदेवाचा मित्र), कांबळे बालाजी (मुलीचे वडील), माळी महेश (पोलीस), चपटे ज्ञानेश्वरी (मुलीची आई), सिध्देश्वर काजापुरे (पोलीस), रसाळ वर्षा (नवरी मुलगी), गायकवाड माया (नवरी मुलीची मैत्रीण) यांनी आपआपल्या भूमिका अत्यंत सुंदर पद्धतीने साकारल्या.
यासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे, समाजकार्य विभागप्रमुख डॉ.दिनेश मौने, उपसरपंच मारूती शिंदे, ग्रा.प.सदस्य दिलीप मुक्ता, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तथा शालेय समिती उपाध्यक्ष बालाजी सुरवसे, सदस्य अजमेर सय्यद, भागवत गरड, प्रसाद स्वामी, दत्तप्रसाद सुगरे, अविनाश राठोड, सिध्दनाथ माने यांनी मौलिक सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुरवसे यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच मारुती शिंदे यांनी तर आभार दिलीप मुक्ता यांनी मानले. या कार्यक्रमाला भातांगळी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि कलापंढरी संस्थेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा