विज तोडणी व विमा कंपन्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन
लामजना प्रतिनिधी-महावितरण ने शेतकऱ्यांना विज बिल सक्ती करून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी बंद करत असून शेतकर्यांची विद्युत तोडणी तात्काळ थांबवावी व पिक विमा परतावा अत्यल्प प्रमाणात मिळत आहे तो परतावा योग्य निकषानुसार मिळावा यासाठी औसा शिवसेनेच्या वतिने राज्य शासनाला निवेदनाद्वारे मागणी शिवसेना औसा तालुका च्या वतीने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना खरीप पीक घेता आल नाही ..आत्ता रब्बी हंगामाची पेरणी झालेली असून पीक वापत असताना महावितरण कंपनीकडून विज बिल सक्ती करून वीज कलेक्शन तोडले जात आहेत.व शेतकऱ्यांचा छळ केला जात आहे .शेतकर्यांची तत्काळ वीज तोडणी बंद करण्यात यावी व खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणामुळे दुबार तिबार पेरणी केली तरी खरीपांचे पीक हाताशी आलं नाही . शेतकर्यांला खरीपाचे पीक हातात येईल अशा अपेक्षा होत्या पण त्यावरील गोगलगाईच्या पादुर्भावामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले .नापीकी मुळे बर्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनी विमा परताव्या पोटी दोन हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुसण्याचे काम विमा कंपनी करत असून असे न होऊ देता तहसीलदार यांनी वीज कलेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी व योग्य निकषानुसार पिक विमा परतावा मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतिने चक्काजाम आंदोलन करण्यात आले..
यावेळी लातुर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने .शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद आन्ना आर्य .युवासेना जिल्हा समनवयक दत्ता मोहोळकर ..औसा शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे .औसा उपशहर प्रमुख सचिन पवार .शिवसेना लामजना सर्कल प्रमुख दिपक बिराजदार .
वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष तानाजीराव जाधव .
सुनील नाईकवाडे ..निलंगा शहर युवासेनाप्रमुख पृथ्वीराज निंबाळकर .लायक शेख.महेश सगर .रेखा पुजारी ..दैवता सगर ,मंगल कांबळे ,महादेव पाटील यांच्या सह शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
टिप्पणी पोस्ट करा