श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत उत्तुंग यश

 श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत उत्तुंग यश


औसा प्रतिनिधी -लातूर जिल्हा क्रिडा विभागामार्फत  शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजन दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून  क्रीडा संकुल, लातूर येथे सुरू असून आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत  औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.यामध्ये क्षीरसागर महेश संजय( 12 वि कला) कुस्ती मध्ये 67 किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम,व विभागीय स्तरावर निवड, महावरकर स्नेहा शिवप्रसाद( 12 वि विज्ञान) कराटे मध्ये जिल्ह्यात प्रथम व विभागीय स्तरावर निवड,दळवे साक्षी औदुंबर( 11 वि विज्ञान) बुद्धिबळ मध्ये जिल्ह्यात प्रथम व विभागीय स्तरावर निवड, मोगरगे निकिता गणेश( 11 वि विज्ञान) बुद्धिबळ मध्ये तृतीय व विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सचिव गिरीश भैया पाटील, सर्व विश्वस्त, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एम.बेटकर, उपप्राचार्य मिसाळ सर, पर्यवेक्षक सी.जी. पाटील, औसा तालुका जुक्टा अध्यक्ष एस.एस.मिटकरी, क्रीडा मार्गदर्शक गुट्टे सर, एन.सी.सी. प्रमुख प्रा. कॅप्टन महावरकर सर, परीक्षा विभाग प्रमुख घुले सर, इंदलकर सर, पठाण सर, साबदे सर, लहाने सर,पवार सर,भोज सर, सौ शिंदे अर्चना मॅडम,सुळकेकर सर, एम. एन.कदम सर,रवी जाधव सर, कारंजे सर, अमित जाधव , तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी,  विद्यार्थीनीं उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने