निलंगा भाजपाच्या वतीने हिराबेन मोदी यांना श्रध्दाजंली

निलंगा भाजपाच्या वतीने  हिराबेन मोदी यांना   श्रध्दाजंली


निलंगा प्रतिनिधी-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या शंभरव्या  वर्षी निधन झाले असून त्यांच्या पार्थिव देहावर दिनांक ३० रोजी गुजरात राज्यात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.निलंगा येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसेवा संपर्क कार्यालय निलंगा येथे हिराबेन मोदि यांना भावपूर्ण  श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.यावेळी  तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे, शहराध्यक्ष विरभद्र स्वामी, माजी नगरसेवक शरद पेठकर, पिंटू पाटील , युवा शहराध्यक्ष तम्मा माडिबोने, माधव पटणे ,पिंटू पांचाळ, खदीर मासुलदार , आप्पाराव सोळंके , सद्दाम अत्तार, प्रभाकर पांचाळ, उत्तम लासुणे, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने