आधुनिक काळात व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज-शरण पाटील

 आधुनिक काळात व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज-शरण पाटील     



                        

मुरूम (प्रतिनिधी) : स्पर्धात्मक काळात तंत्रज्ञानाबरोबर कौशल्य युक्त युवा पिढी स्वावलंबी बनण्याच्या दृष्टिकोनातून  व्यवसायभिमुख शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी प्रतिपादन केले. मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसीत आयोजित नूतन विद्यार्थी स्वागत व पालक मेळावा बुधवारी (ता. २५) रोजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, श्रमजीवी कॉलेज ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सतिश शेळके, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस महालिंगप्पा बाबशेट्टी, सुजित शेळके, फॉर्मसी कॉलेजचे समन्वयक प्रा. डॉ. रविंद्र आळंगे, प्रा. लक्ष्मण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड म्हणाले की, काळाची पाऊले ओळखून संस्थेने असे व्यवसायभिमुख अभ्यासक्रम आणून या परिसरातील विद्यार्थ्यांना एक मोठी संधीच उपलब्ध करून दिली आहे. डॉ. पेठकर म्हणाले की, उद्याचा सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर फार्मसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यावेळी प्राध्यापिका दिपाली स्वामी, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. योगेश पाटील, अमोल कटके यांचा मान्यवरांच्या हस्ते स्वागत करुन अल्प परिचय करून देण्यात आला. डी फार्मसी व बी फार्मसीचे शुभम कांबळे, महेश स्वामी, सबेरा पटेल, रतन मुडे, पूजा ख्याडे,  श्रीकांत शेळके, गणेश बिराजदार, अदिती राजपूत, दिशा ठाकूर आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रियंका काजळे यांनी मानले.                        

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने