दयानंद विधी महाविद्यालयात 'तुमचा ताण जाणून घ्या'या विषयावर व्याख्यान संपन्न
लातूर : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालय, लातूर येथे 'तुमचा ताण जाणून घ्या' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. यतीश जोशी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. पुनम नाथानी लाभल्या.या प्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. पुनम नाथानी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देवून डॉ. यतीश जोशी यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. ममता पारीक यांनी महाविद्यालय व विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली. तसेच प्रमुख वक्ते डॉ. यतीश जोशी यांचा कार्यानुभव व प्राप्तींची माहिती उपस्थितांना दिली.
या समयी प्रमुख वक्ते डॉ. यतीश जोशी यांनी तणाव या विषयावर आपले विचार मांडताना सांगितले की, “तणाव हा आपल्याला जन्मापासून असतो; पण तो ज्यावेळेस जास्तीचा होतो तेंव्हा माणूस डिप्रेशनमध्ये जातो.” ते पुढे म्हणाले की, “जेव्हा माणसासमोर कुठली समस्या येते आणि माणूस तणाव घेतो त्यावेळेस माणसाकडे तीनच पर्याय असतात… ते म्हणजे सामना करणे, पळून जाणे किंवा स्तब्ध उभे राहणे. माणसाला तणावाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे आणि तणाव मुक्त जीवन जगता आले पाहिजे. ताण घालवण्यासाठी डॉ. जोशी यांनी योगा आणि मेडिटेशन हा उत्तम उपाय असल्याचे सुचविले. तसेच मेडिटेशन म्हणजे काय हे ही स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप करताना प्र. प्राचार्य डॉ. पुनम नाथानी यांनी विद्यार्थ्यांना जीवन हे आनंदाने जगणे महत्त्वाचे आहे. ताण घेवून कोणीही आपले ध्येय किंवा समस्यांचे निराकरण करू शकत नाही असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना उत्साह वर्धक मनोबल दिले.
या कार्यक्रमास कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. ममता पारीक, प्रा. प्रिया पाटील, प्रा. उन्नती जाधव, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तथा प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उन्नती जाधव यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा