कॉक्सिट महाविद्यालयास प्रकाश आंबेडकरांची सदिच्छा भेट
लातूर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील कॉक्सिट महाविद्यालयास शुक्रवार, २७ रोजी सकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली.रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, उपाध्यक्ष एल. एम. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी ऍड. आंबेडकर यांचे फेटा बांधून, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून स्वागत केले.
ऍड. आंबेडकर हे लातूर दौर्यावर आले आहेत. शुक्रवार, २७ रोजी सकाळी त्यांनी येथील कॉक्सिट महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. एम. आर. पाटील व प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी त्यांना महाविद्यालयाच्या इमारतीसह महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. आंबेडकर यांनी महाविद्यालयातील अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नामांकित आयटी कंपन्यांमध्ये तत्काळ मिळणार्या मोठ्या पगाराच्या नोकर्यांबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ घेत असलेल्या परिश्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी कॉक्सिट महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, विभागप्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. ईश्वर पाटील, प्रा. एस. व्ही. देशमुख, प्रा. तानाजी खरबड, प्रा. नितीन वाघमारे, प्रबंधक संतोष कांबळे, कार्यालय अधीक्षक प्रदीप कावळे, जनसंपर्क अधिकारी जितेंद्र बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी अमोल लांडगे, सचिन लामतुरे यांच्यासह कॉक्सिटचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा