शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

 शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

 लातूर- येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
 रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण गोविंद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या शारदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी, वाघमारे, डॉ. अतुल वाघमारे, डॉ. सुशील वाघमारे उपस्थित होते. यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.त्यात लेझीम, नृत्य, गायन यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी एकनाथ जाधव, क्रीडा शिक्षक बाळकृष्ण देवडे, मानसी पाटील, आकाश राठोड, ओमप्रकाश लवटे, दर्शना देशमुख, माधुरी पाटील, वर्षा कांबळे, रेणुका समुद्रे, ऐश्वर्या बागल, गीतांजली गिरी, प्रांजली पाटील, प्रियल गोखले, साधना भेटे, उषा गुडदे, शीतल नडगिरे, अनघा पाटील, शारदा नागभाटी, अश्विनी पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोहित जाधव यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने