वाचन करणारी माणसे विचाराने आणि कर्माने श्रीमंत होतातःप्रभाकर बंडगर


 वाचन करणारी माणसे विचाराने आणि कर्माने श्रीमंत होतातःप्रभाकर बंडगर

_____________________________
लातूर - एक पुस्तक एखादयाच्या आयुष्याला कलाटणी देवू शकते . वाचनामुळे माणूस भानावर येतो . पुस्तके वाचणारा माणूस कधीही व्यसन करीत नाही . वाचनामुळे ज्ञानात भर पडते तर टी .व्ही आणि मोबाईलमुळे माणसे निष्क्रिय होतात.म्हणून वाचन करणारी माणसे मनाने, विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात असे प्रतिपादन संस्था सचिव प्रभाकर बंडगर यांनी केले .
येथील संत कबीर सार्वजनिक वाचनालय आयोजीत  ग्रंथालय शाळेच्या दारी  उपक्रमांतर्गत विद्यार्थी वाचक सभासद नोंदणी शुभारंभ सुशीलादेवी नगर येथील श्री .केदारनाथ माध्यमिक विद्यालयात ग्रंथमित्र पांडूरंग अडसुळे आणि आर.एस.मोरे यांच्या हस्ते  नुकताच करण्यात आला.त्यावेळी अध्यपदावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ग्रंथालय व शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्याचा ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रमुख मार्गदर्शनात ग्रंथमित्र पांडूरंग अडसुळे यांनी वाचनाचे महत्त्व आणि ग्रंथालय चळवळीची ओळख सांगत असताना, ग्रंथालये हे व्यक्तिच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे . सामान्य वर्गातील व्यक्ति त्यांच्या आवडीची किंवा गरजेची सर्व महागडी पुस्तके घेवू शकत नाहीत . पर्यायाने ते पैशाच्या अभावी ज्ञान आणि शिक्षणापासून वंचीत राहतात . यासाठी ग्रंथालये ही ज्ञान वाढविण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतो . म्हणून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांने याचा फायदा उचलावा असे आवाहन केले .
अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात प्रभाकर बंडगर  यांनी सांगितले की, या प्रसंगी वाचनालयाच्या वतीने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी वाचनालयाच्यावतीने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
याप्रसंगी श्री.विद्यासरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बुर्ले बी.एम., संस्काररत्न शैक्षणिक संस्थेचे संस्थापक दत्तात्रय लवटे, वाचनालयाचे लिपिक महेश लवटे, शालेय शिक्षक एस.टी .स्वामी, एस.एस.सूर्यवंशी, एस.बी. मदने, एस.आर.वैद्य , एस.एम.मुदगले, पवार मॅडम, मोरे मॅडम, भातलोंढे मॅडम, बी.पी.जाधव, जोडतले एम के . माळी,हजारे व डोंबाळे सर, यांची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यकमाचे सुत्रसंचालन श्रीमती हिरवे एस.जे.मैडम यांनी तर आभार प्रदर्शन होनमाने डी.आर यांनी मानले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने