जागतिक पातळीवर नदी आणि तृतीयपंथी यांना उजागर करणारी 'नदीष्ट'- समीक्षक ऋषीकेश देशमुख

जागतिक पातळीवर नदी आणि तृतीयपंथी यांना उजागर करणारी 'नदीष्ट'- समीक्षक ऋषीकेश देशमुख 




लातूर प्रतिनिधी -शब्दांकित साहित्य मंचच्या "पुस्तकावर बोलू काही" या उपक्रमा अंतर्गत  प्रसिद्ध लेखक
 मनोज बोरगावकर यांच्या 'नदिष्ट'  
या पुस्तकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन',
(संस्थापक अध्यक्ष,शब्दांकित साहित्य मंच, लातूर)यांनी केले.

            अध्यक्षीय समारोपात श्री.ऋषीकेश देशमुख सर (प्रसिध्द समिक्षक, नांदेड) यांनी महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. 
नदीष्ट मध्ये मौलिक विचार व मौलिक कहाण्या आल्या आहेत. नदी व संस्कृती टिकविण्यासाठी नदीष्ट ला आत्मसात करावे लागेल. नदीष्ट वेगळा विषय वेगळा आशय असून जागतिक पातळीवर नदी आणि तृतीयपंथी यांना उजागर करीत आहेत. 
  पर्यावरण, तृतीयपंथी, सामान्य माणसं यांचं जगणं किती उदात्त आहे हे नदीष्ट वाचल्या शिवाय कळत नाही. नदीष्ट ची 7 वी आवृत्ती आली आहे.याचा ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 
                        वक्ता प्रा. प्रभा वाडकर मॅडम (अभ्यासक, लातूर) यांनी सखोल भाष्य केले. आज झपाट्याने विस्तारणारे शहरीकरण, विकासाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडला जातोय .लेखक अस्वस्थ होतो .
  अनेकांसाठी नदी म्हणजे आपल्या भावना डंपिंग करायची जागा असू शकते .म्हणूनच या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा वावर आहे. त्यांच्या कहाण्या म्हणजे नदीच्या पृष्ठभागावरून तळाचा अंदाज न येण्यासारखा...
      पण लेखक आपलं माणूसपण सिद्ध  करीत त्यांची मनं लिलया मोकळं करीत त्यांच्या कहाण्या उलगडत जातात. लेखकाला मिळालेला प्रतिसाद पाहून वाचकांची मनंही ओथंबून जातात .येथे लेखकाची अकृत्रिम जिंदादिली प्रत्ययास येते .
                 प्रमुख उपस्थिती श्री.मनोज बोरगावकर,( प्रसिद्ध लेखक, नांदेड) यांनी पुस्तक निर्मिती प्रक्रिया वर विस्तृत विवेचन केले.ज्यातून 'नदिष्ट'चा प्रवास उलगडत गेला. निसर्ग आणि नदी वाचली 
पाहिजे. आपली जी संस्कृती आहे ती
सामान्यांनी आणि वंचितानीच जपून 
ठेवलेली आहे. तृतीय पंथीयांच्या बिरादरीत असा रिवाज आहे की , खानेवालें के सामने हम कभी नहीं आते ! हा ट्रॅडिशनल विजड्म जपला पाहिजे. भेदभाव न करता सर्व घटकांना सामावून घेतले पाहिजे. अशा भावना व्यक्त केल्या. 
       सूत्रसंचालन शब्दांकित साहित्य मंचच्या  सचिव शैलजा कारंडे यांनी केले.प्रसिध्द साहित्यिक छाया महाजन- अौरंगाबाद, कवयित्री गौरी देशमुख-माजलगाव, आरती टोपले-गोवा, 
उमा कोल्हे- पुणे, आशा पाटील-पंढरपूर, साहित्यिक अशोक कुबडे, नांदेड,डॉ.कुसुमताई मोरे, डॉ.ज्ञानदेव राऊत, डॉ.नंदकुमार माने, मा. सविता नरहरे, सुरेश गीर 'सागर' -अबुधाबी, डॉ.वसुंधरा गुडे,उषा भोसले, विजया भणगे, वर्षा गंगणे, शीला कुलकर्णी, सुनीता मोरे, संचिता खोत, सुषमा बुचडे, विद्या बयास, प्रांजली हरकुडे, रेखा गलगले, अनिकेत दुधभाते,डॉ.सुरेखा बनकर, मंजुषा स्वामी, श्रावणी शिपटे- पुणे ,नलिनी बोराळे ,मनोज बोरगावकर, इ. रसिक श्रोते कार्यक्रमात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने