श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी




      औसा प्रतिनिधी- शहरातील श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रगती शिंदे (वैद्यकीय अधिकारी माकणी )सौ .माधुरी जगदाळे तसेच ॲड. संजय शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक  दिलीप कुमार माशाळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला व विद्यार्थ्यांना उपदेश केला. प्रमुख अतिथी डॉ. प्रगती शिंदे व ॲड संजय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाल्या,की मी या शाळेची विद्यार्थी असून या शाळेमुळे माझ्या जीवनाची प्रगती झाली. आज शाळेत आल्यावर माझे बालपण व बालपणीचे गुरुजन पाहून खूप आनंद झाला असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पण आपले मनोगत व्यक्तत केले. इयत्ता दुसरी 'ड 'या वर्गाचा परिपाठ सादर झाला. या वर्गातील विद्यार्थिनीने या दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व महिला शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व शालेय अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता पहिली ते चौथी चित्रकला स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुखाच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व  बक्षीस देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने