क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी


औसा प्रतिनिधी तालुक्यातील जय क्रांती इंग्लिश स्कूल किल्लारीयेथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी  सावित्रीबाई फुले यांच्या वेशात आलेल्या बालिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव सर यांनी करताना त्यांचे विचार आणि आपला देश, तसेच आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या समाजसेविका असे उद्गार काढले.
यावेळी अनेक मूलांनी आणि मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर भाषणे केली. त्यांनी थोर समाजसेविका तसेच स्त्रीची प्रेरणा स्रोत आहेत असे विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका वैशाली दुधनी मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात म्हणाले कि, सावित्रीबाई आणि महात्मा फुले  आपल्या कार्याच्या जोरावर स्त्रियांमधील अंधकार शिक्षणाच्या माध्यमातून दूर केला आणि आज खऱ्या अर्थाने  मुलीं जगात  नावलौकिक होत आहेत. ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्यात महात्मा ज्योतिराव फुले यांची साथ होती त्याप्रमाणे माझ्याही जीवनात बसवराज दुधनी ( संस्थेचे अध्यक्ष) यांची यशस्वी कार्यात साथ आहे असे ते म्हणाल्या.
यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चर्चासत्र घेण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी, तर आभार हिरा मॅडम यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने