आ. काळेंनी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले-माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

काळेंनी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले-माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील







औरंगाबाद: विधान मंडळ, सभागृहात आ़ काळे हे शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतात. वेळप्रसंगी आपल्या पक्षाबरोबरच विरोधी सरकार, मंत्र्यांना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी धारेवर धरतात. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी आ. काळे हेच सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व असल्याने निवडणुकीत त्यांना प्रथम पसंतीचे मत देवून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जालना येथे अमित हॉटेल आणि हिंगोली येथे सरजूदेवी विद्यालय प्रांगणात मंगळवारी (दि.२४) आयोजित शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार आ. विक्रम काळे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेंद्र शिंगणे, अरविंदराव चव्हाण, शिवाजी चोथे, भास्कराव अंबेकर, सुरेश जेथलिया, राजाभाऊ देशमुख, निसार देशमुख, कपिलभैय्या आकात, सुरेखा लहाने, जयप्रकाश दांडेगावकर, राजू नवघरे, पंडितराव देशमुख, संतोष तारफे, राजेश पा. गोरेगावकर, दिलीप देसाई, विनायक भिसे, दिलीप चव्हाण, संदेश देशमुख, निहाल भैय्या शेख, मुनीर पटेल, कुसूम भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा शिक्षक-कर्मचारी महासंघाने आ. विक्रम काळे यांना जाहीर पाठींबा दिला. त्याचे अधिकृत पत्र संघटनेचे शिवाजी पवार यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे दिले. आ. काळे यांनी पाठपुरावा करून शिक्षकांची जुनी पेन्शन, शाळा अनुदान, नवीन भरती याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. महाविकास आघाडीने सकारात्मकता दर्शविली असताना राज्यात अचानक सत्ताबदल झाला. तरीदेखील मोठ्या शिकस्तीने त्रुटींच्या पूर्ततेचा शासननिर्णय तयार करून घेतला. परंतु, राज्यपालांच्या निर्णयामुळे हा शासननिर्णय निर्गमित होऊ शकला नाही. शिक्षकांच्या हितासाठी त्यांना मिळणाºया २८ आजारांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती यादीमध्ये कोरोना आजाराचा देखील समावेश करून शिक्षकांना फायदा मिळवून दिल्याचे मान्यवरांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने