सद्गुरूंनी समाजाला नवी दिशा दिली – साध्वी श्रेया भारतीजी


 सद्गुरूंनी समाजाला नवी दिशा दिली

 – साध्वी श्रेया भारतीजी

      लातूर/प्रतिनिधी:पृथ्वीवर अवतार घेणारे पुरुष समाजाला दिशा देण्याचे काम करतात.सद्गुरू श्री आशुतोष महाराज यांनीही याच पद्धतीने अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या समजाला नवी दिशा देण्याचे काम केले,असे प्रतिपादन साध्वी श्रेया भारती यांनी केले.
    गुरुदेव श्री आशुतोष महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योती जागृति संस्थानच्या  वतीने श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या पाठीमागील मैदानामध्ये सात दिवसीय श्री राम कथेत कथा विवेचन करताना साध्वी बोलत होत्या.श्री राम कथेच्या पाचव्या दिवशी साध्वी श्रेया भारतींनी प्रभू श्रीरामचंद्र व भरत यांच्यातील प्रसंग,सुखी जीवनाचा मार्ग तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या क्रांतिकारी कार्याविषयी माहिती दिली.जेंव्हा-जेंव्हा या पृथ्वीतलावर महान व्यक्ती येतात तेंव्हा समाजाला सुंदर बनवण्याचे व्रत घेतात.समाज बदलण्यासाठी,
सुधारण्यासाठी या अवतारी व्यक्ती कार्य करतात.त्याचप्रमाणे आशुतोष महाराजांनीही समाज बदलण्याचे व्रत घेतले.  भरकटलेल्या तरुणांना महाराजांनी योग्य मार्ग दाखवला.
    त्यांनी सांगितले की,जेंव्हा जग रुद्रवाद,अंधश्रद्धेच्या अंधारात ग्रासले होते,तेंव्हा तत्त्वज्ञ, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी समाजाला नवी दिशा दिली.आज पुन्हा गुरुदेव श्री आशुतोष महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायी समाजाच्या उन्नतीसाठी निश्चयी कार्य करत आहेत. 
       ड्रग्जमुळे अनेक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यासोबतच तरुण वर्गाच्या व्यक्तिमत्त्वावरही विपरीत परिणाम होत आहे.वृद्धांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो.तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन संस्कारहीन आणि चारित्र्यहीन होत आहे.आज ही समस्या आपल्या समाजापुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. त्यापासून सुटका मिळविण्यासाठी अध्यात्म सोबत घ्यावे लागेल.कथेच्या शेवटी कथा व्यास यांनी सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
         दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या अंतर्गत सामाजिक कल्याणासाठी अनेक प्रकल्प चालवले जात आहेत.तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी सॅम प्रकल्प राबविला जात आहे. मंथन प्रकल्पांतर्गत गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. दिव्यांगांच्या मदतीसाठी अनोखा अंतर्दृष्टी प्रकल्प राबविला जात असून त्यात त्यांना रोजगारही दिला जातो.संस्थेच्या संतुलन प्रकल्पा अंतर्गत वेळोवेळी महिला जागृतीसाठी विविध कार्यक्रम, पदयात्रेचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमात युवाशक्ती निस्वार्थीपणे योगदान देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करत आहे.देश-विदेशातील लाखो भाविक त्याचा लाभ घेत आहेत.या दिव्य आणि अनोख्या शिबिराचे सर्व लाभ तुम्हीही घेवू शकता.
    पाचव्या दिवशीच्या कथेसाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुधाकर शृंगारे,गणपतराव बाजुळगे,अशोक गोविंदपुरकर, ह.भ.प.कैलास महाराज मद्दे लिंगाळकर,संगमेश्वर केंद्रे, देविदास काळे,अविनाश देवशेटवार ॲड.बळवंत जाधव, अर्जुन जाधव,लक्ष्मण नागिमे, गोविंद चिलकुरे,बापू भिंगे,सतिश भिक्का,पुरुषोत्तम नोगजा यांची उपस्थिती होती.शेवटी पावन पुनीत आरतीने श्रीराम कथेच्या पंचम दिवसाची सांगता झाली.पंडित गडदे,श्रीकांत कदम व अशोक कासनाळे यांच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने