लक्ष्मी नागरी पतपुरवठा संस्थेत टी.जी. भोसले पॅनलचा दणदणीत विजय

 लक्ष्मी नागरी पतपुरवठा संस्थेत टी.जी. भोसले पॅनलचा दणदणीत विजय

मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार-पॅनल प्रमुख अशोक (गट्टू)अग्रवाल
लातूर/प्रतिनिधी ः- लातूर येथील नावाजलेली लक्ष्मी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतपुरवठा संस्था असून या पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून व्यापार्‍यांसह ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम सातत्याने होत आहे. नुकतीच या संस्थेची निवडणूक पार पडलेली असून यामध्ये टी.जी. भोसले सहकार पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे. या विजयाच्या माध्यमातून सभासदांनी पॅनलवर जो विश्वास दर्शविलेला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आगामी काळात होईल अशी ग्वाही पॅनल प्रमुख तथा नवनिर्वाचित संचालक अशोक (गट्टू) अग्रवाल यांनी दिले आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात विविध सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. मात्र या पतसंस्थापैकी कांही मोजक्याच संस्था व्यापार्‍यांच्या व ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आहेत. यापैकी एक म्हणजे लक्ष्मी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतपुरवठा संस्था होय. गेल्या तीस वर्षाच्या अधिक काळापासून या पतसंस्थेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन गरजवंतांना या पतसंस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक पतपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर या संस्थेने स्वच्छ व पारदर्शक कारभार करून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केलेला आहे. या पतसंस्थेची 32 वर्षानंतर संचालक मंडळ निवडणूक पार पडलेली आहे.  या निवडणूकीसाठी टी. जी. भोसले सहकार पॅनलने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. सुरुवातीलाच या पॅनलच्या दोन महिला प्रतिनिधी आणि एक अनुसुचीत जाती जमाती गटातून असे तीन उमेदवार बिनविरोध निवडूण येत या पॅनलने विजयी सलामी दिली होती.  या पॅनलचे प्रमुख अशोक (गट्टू) अग्रवाल यांनी भोसले पॅनल हे स्वच्छ व पारदर्शक कारभाराची परंपरा आगामी काळातही अखंडीतपणे सुरु ठेऊन ग्राहकांचा विश्वास दृढ करण्यासाठी अधिक जोमाने काम करून या संस्थेची आर्थिक पत उंचाविण्यासाठी  बांधील राहिल असा विश्वास दिलेला होता.
पॅनल प्रमुख अशोक (गट्टू) अग्रवाल यांनी केलेल्या आवाहनास सभासदांनी मोठा प्रतिसाद देऊन या पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. या पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण गटातून अशोक (गट्टू) अग्रवाल, तुळशीराम गंभीरे, गोविंदलाल पारीख, किशोर बिदादा, आनंद माने, लक्ष्मीकांत सोमाणी हे तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून प्रल्हाद दुडिले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. यापुर्वीच महिला प्रतिनिधी म्हणून सौ. संगीता सुर्यवंशी, सौ. सुवर्णा भोसले, तर अनुसुचीत जाती जमाती गटातून विश्वनाथ इंगळे हे उमेदवार बिनविरोध निवडूण आलेले आहेत. या निवडणूकीत टी.जी. भोसले सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भोसले पॅनलला दणदणीत विजय प्राप्त करून दिल्याबद्दल पॅनल प्रमुख अशोक (गट्टू) अग्रवाल यांनी मतदारांचे आभार मानलेले असून मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी संचालक मंडळ कार्यरत राहिल अशी ग्वाही देऊन आगामी काळात स्वच्छ व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्यात येईल अशा विश्वास अशोक (गट्टू) अग्रवाल यांनी दिलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने