ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प द्वारा आयोजित प्रकल्प प्रदर्शन 2023 या प्रकल्प दर्शनाचे उद्घाटन
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प द्वारा आयोजित प्रकल्प प्रदर्शन 2023 या प्रकल्प दर्शनाचे उद्घाटन नरहरे लर्निंग होमच्या वास्तुत आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले मुलांच्या सर्जनशीलतेला व नवनिर्मितीला चालना देणाऱ्या या प्रकल्प प्रदर्शनातील प्रकल्पांना भेट देत असताना प्रकल्पाविषयीची अधिकची माहिती जाणून घेत पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना मुलांनी दिलेली समर्पक उत्तरे ऐकून मुलांचा बोलण्यातील आत्मविश्वास पाहून आमदार साहेबांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. उद्घाटन प्रसंगी केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले आज मी फक्त आमदार म्हणून उद्घाटनासाठी आलेलो नाही तर एक माजी पालक म्हणूनही निमंत्रित आहे; आणि ज्ञानप्रकाशचा पालक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपलं शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे या शाळेच्या विचारांसोबतच असल्याने माझ्या दोन्ही पाल्याच्या जडणघडणीत ज्ञानप्रकाशचा मोलाचा वाटा आहे. लर्निंग होम हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षक व पालक यांच्यासाठी ही शिकण्याचे केंद्र आहे असे ही ते याप्रसंगी म्हणाले.
या कार्यक्रमात इयत्ता 3 री व 4 थी ज्ञानप्रकाश टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या प्रकल्प प्रदर्शनात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करून माहिती घेऊन मांडणी केली आहे. या प्रकल्प प्रदर्शनामध्ये एकूण 110 विषय घेऊन मुलांनी प्रकल्प सादर केले आहेत. यात विज्ञान, मुलाखती, अर्थशास्त्र, गणित अभ्यास, भूगोल, सामान्य ज्ञान, इंग्रजी, पर्यावरण, भारतीय विज्ञान अशा वेगवेगळ्या कक्षातून मुलांनी वैचारिकेतून मांडणी केली आहे.
ज्ञानप्रकाशच्या संचालिका व मुख्याध्यापिका आदरणीय सविता नरहरे मॅडम यांनी स्वागत प्रमाणे व्यक्त केले तर प्रकल्प प्रमुख आदरणीय नरहरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर इयत्ता नववीतील समृद्धी जाधव व अवनी गुळवे या विद्यार्थिनींनी मराठी व इंग्रजी भाषेतून प्रभावी सूत्रसंचालन केले याप्रसंगी शोभा अभिमन्यू पवार ,आकांक्षा पवार, कुलकर्णी सर, अशोक गुरदाळे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रकल्प दर्शनाच्या निमित्ताने उद्या दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आकाश दर्शन व इयत्ता चौथी व पाचवीच्या मुलांनी आयोजित केलेली आनंद नगरी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे शिक्षण प्रेमी पालकांनी व नागरिकांनी या प्रकल्पास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ज्ञानप्रकाशने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा