स्री मनाचा कानोसा घेणाऱ्या चौकट या संहितेत सर्व स्तरातील स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण - प्रा.चंद्रकला भार्गव

 स्री मनाचा कानोसा घेणाऱ्या चौकट या संहितेत सर्व स्तरातील स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण - प्रा.चंद्रकला भार्गव 

    लातूर/प्रतिनिधी:स्री मनाचा कानोसा घेणाऱ्या चौकट या  संहितेत सर्व स्तरातील स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण आहे. 
पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांभोवती असलेल्या अदृष्य चौकटीचे वास्तव स्त्रियांनी जाणून घेऊन त्यावर सकारात्मक विचार करावा,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. चंद्रकला भार्गव यांनी केले. 
    रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित लातूर बिल्ड एक्स्पो मध्ये उमा व्यास लिखित 'चौकट' या संहितेचे अभिवाचन झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या अभिवाचनात प्रा.सुचिता वाघमारे,सुनिता कुलकर्णी देशमुख,अर्चना पाठक,उमा व्यास यांनी सहभाग घेतला. 
    रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने लातूर बिल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते.यास लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गृहनिर्माण व सजावट तसेच फर्निचर,इलेकट्रीकल,सोलर सिस्टीम,ऑटोमेशन,वास्तुशास्त्र, अशा अनेक स्टॉल्स सोबतच सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन एक्स्पो मध्ये करण्यात आले होते.या एक्स्पोमध्ये आयोजित केलेल्या चौकट या संहितेच्या अभिवाचनास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या प्रेरणा होनराव या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना भट्टड तर आभार उमा व्यास यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने