महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षपदी प्रा. वीणा कुलकर्णी

 महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षपदी प्रा. वीणा कुलकर्णी

 लातूर: महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षपदी येथाील दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. वीणा भालचंद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने यांनी ही निवड जाहीर केली आहे. प्रा. कुलकर्णी यांनी कोरोना योद्धा म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातीलही प्रा. कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ. भताने यांनी प्रा. कुलकर्णी यांची ही निवड केली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने