जि प प्रा शा सोमनाथपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

जि प प्रा शा सोमनाथपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा



सोमनाथपूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा व्य स अध्यक्ष संजय बाबुराव राठोड तर उद्घाटक म्हणून गट शिक्षणाधिकारी शेख एस. के. होते.तर प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सिंदाळकर एस.पी,केंद्र प्रमुख श्रीमती मुळे प्रतिभा तर सरपंच श्रीमती अंबिका पवार,उपसरपंच  अमित माडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष मारोती पवार , माजी पं.स. सदस्य  जितेंद्र शिंदे, विदेश पाटील ,जेष्ठ नागरिक 
 तोंडारे अप्पा, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन माधव अंकुशे, सचिव सर्जेराव भांगे, मार्गपवार,बाबु चव्हाण, निळकंठ पाटील, अरविंद धानूरे व समस्त गावकरी, पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत,बंजारा गीत ,लावणी गीत, इत्यादी बहारदार गीतांवर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  स्वामी एम.व्ही. यांनी तर स्नेहसंमेलनाचे नृृत्य सादरीकरण जाधव सुनील,
 संदीप कळसकर , गायकवाड राम , सय्यद रसुल, वेशभूषा श्रीमती जाधव मॅडम,श्रीमती झोले मॅडम व शासकीय अध्यापक विद्यालयातील छात्र शिक्षक यांनी उत्तम रीतीने केले.कार्यक्रमाचे संचलन व आभार मा श्री दामाजी बालुरे सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने