शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


 लातूर- येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याचदिवशी सायंकाळी त्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देऊन गुणवंत होण्याच्या शुभेच्छा देत निरोप देण्यात आला.
 रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी होते. यावेळी स्वयंशासनदिनानिमित्त मुख्याध्यापकाची भूमिका आदित्य साखरे या विद्यार्थ्याने उत्कृष्ठरित्या पार पाडली. ऋतुजा मडोळे, झियान शेख, सिद्दीक शेख यांनी सहशिक्षक व इतर भूमिका पार पाडल्या. निरोप समारंभ कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी पुरी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन वर्षभर केलेल्या शिस्तबध्द व चांगल्या वर्तनाबद्दल अभिनंदन केले. यावेळी स्कूलचे शिक्षक रोहित जाधव, एकनाथ जाधव, अनघा पाटील, उषा गुडदे, माधुरी पाटील, मानसी पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
 यावेळी साधना भेटे, शीतल नडगिरे, वर्षा कांबळे, गीतांजली गिरी, ऐश्वर्या बागल, बाळकृष्ण देवडे, कांचन देवधर, अश्विनी पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन नववीची विद्यार्थिनी समीक्षा चिलकुरे हिने तर प्रास्ताविक पूजा चव्हाण यांनी केले. आभार रागिनी ठोंबरे यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने