विरशैव कक्कय्या समाजातर्फे सत्काराचे आयोजन

 विरशैव कक्कय्या समाजातर्फे सत्काराचे आयोजन







मुरुम(प्रतिनिधी)  विरशैव कक्काय्या समाज  व व्ही. के. प्रतिष्ठान मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रतिष्ठितांचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला.
यासाठी जमलेले जेष्ठ नागरिक माता-भगिनी सिंधू बाई मारुती खंदारे ज्येष्ठ नागरिक वाई 65 वर्ष मिरज,  कमलाबाई समिंदर त्रिमुखे ज्येष्ठ नागरिक वय 68 वर्ष 
मुक्काम पोस्ट बसवकल्याण,  ज्ञानेश्वर श्रीकर वय ६५,  कोंडीबा मारुती कावळे वय ७२ वर्ष लातूर , श्रावण चौगुले वय 65 वर्षे उमरगा , आप्पाराव खंडू कावळे वय 65 वर्ष लातूर , बालाजी महादेव कावळे वय 59 वर्ष लातूर , पंडित दगडू कावळे वय 54 लातूर , कपूर उद्योगपती औरंगाबाद. यांचा सत्कार सोहळा पार पडला व तसेच श्री शिवाजी सिद्राम शिंदे, अध्यक्ष वीर शैव समाज मुरूम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे मनोगत होत असताना श्री शिवाजी सिद्राम शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी समाजा ला संबोधित करत असताना माता भगिनी वरिष्ठ नागरिक यांचे कार्य व तसेच त्यांचे समाजाप्रती काही देणं लागतो म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन ज्योतिबा गणपत शिंदे सोलापूर व आभार तात्याराव शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले समाज बांधव वसंत भिवाजी शिंदे माजी अध्यक्ष, गिरजप्पा कावळे, धनराज शिंदे, ज्योतीराम शिंदे, राजेंद्र कटके, अंबादास शिंदे व इतर समाज बांधवांनी घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने