दयानंद कला महाविद्यालयात स्वामी दयानंद सरस्वती जयंती निमित्त 'गझलाविष्कार' चे आयोजन

 दयानंद कला महाविद्यालयात स्वामी दयानंद सरस्वती जयंती निमित्त 'गझलाविष्कार' चे आयोजन






लातूर :  दयानंद कला महाविद्यालयात स्वामी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त 'गझलाविष्कार' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गझलकार शायर सुरेश गीर’सागर’ व अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. पी. गायकवाड लाभले.
      प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना डॉ. सुनीता सांगोले यांनी मूळशंकर ते स्वामी दयानंद सरस्वती हा प्रवास होताना स्वामीजींची होणारी जडणघडण यावर प्रकाश टाकला. देव दगडात नसून, माणूस आपल्या कर्मावर, कर्तुत्वावर, ज्ञानावर विकसित होतो. सत्याच्या मार्गावर चालणारा, वेदातील बोधाचा स्वीकार करून संस्कारित झालेला माणूस जीवनात यशस्वी होतो. 'अज्ञानी होना गलत नहीं है, पर अज्ञानी बने रहना गलत है.' सत्य हे सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी वाट दर्शविणारे असते. अशा स्वामीजींच्या विचारांचे दाखले देत हे विचार तरुण पिढीत रुजावेत म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असा कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
        शायर सुरेश गीर ‘सागर’ यांनी दयानंद सरस्वती यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेतला. स्वामीजींनी वैदिक धर्माचा स्वीकार करून पारंपरिक मूर्ती पूजा मोडीत काढली. आर्य समाज हा नास्तिक स्वरूपाचा नसून निर्गुण निराकार माणसातला देव मानणारा समाज आहे.
    "न मैं मस्जिद जाता हूँ न मैं मंदिर जाता हूँ !
गिरजा भी मालूम नहीं फिर भी स्नेह प्रभु का पाता हूँ ! "
" न हिन्दू न मुसलमाँ न सिख न ईसाई हूँ !
वैदिक धर्मि आर्य मैं ऋषि दयानंद का अनुयायी हूँ ! "
" ईश्वर उपासना स्वस्थ तन से और शुध्द मन से हो !
पाखंड कर्मकांड से नहीं संध्या और हवन से हो ! "अशा आपल्या अनेक गझलांतून दयानंद सरस्वती यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून सामाजिक समता, बंधुता आणि सत्य ही मूल्ये जोपासणे काळाची किती गरज आहे याची श्रोत्यांना जाणीव करून दिली. श्रोत्यांना हसवत हसवत अंतर्मुख केले, हे त्यांचे विशेष होते.
  अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड म्हणाले की, गझल हा प्रकार समजायला कठीण आहे. गझलकार सुरेश गीर 'सागर' यांनी अत्यंत मार्मिक भाषेत राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक सत्यधर्म व मानवता ही जगाला तारणारी महत्त्वाची मूल्ये गझलेच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. प्रशांत मान्नीकर, प्रा. अनिलकुमार माळी, यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मीना घुमे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरस्लान सय्यद आणि शुभांगी चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अंगद भुरे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादात कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने