मारुती महाराज साखर कारखान्याकडून १,१५,००० मेट्रिक टन उसाचे ७९ दिवसांत गाळप

 मारुती महाराज साखर कारखान्याकडून  १,१५,००० मेट्रिक टन उसाचे ७९ दिवसांत गाळप




लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील बेलकुंड येथील संत मारुती महाराज साखर कारखान्याकडून चालू गाळप हंगामात आजतागायत ७९ दिवसांत १ लाख १५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून त्यातून १ लाख २१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करत प्रथमच कारखान्याने एस ३०, एम ३०, या दोन ग्रेडच्या शुभ्र साखरेचे उत्पादन केले आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यासाठीं चालू हंगामात १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्न करीत आहे

कारखान्याने इतिहासात पहिल्यांदाच विक्रम केला
राज्याचे माजी मंत्री, मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार मारुती महाराज साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून चालू हंगामात योग्य नियोजन केल्याने एकाच दिवसात कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २,५४० मे. टन उच्चतम गाळप करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

चालू गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी कारखान्याने जिल्हा बँकेकडून दिलेल्या ५ हार्वेस्टर मशिन कार्यरत असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाची तोड यंत्रामार्फत सुरू असून पारदर्शकता ठेवून अचूक कार्य करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. उसाचे बिल १० दिवसाला ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहे तसेच शेतकरी सभासद यांच्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्णत्वाच्या मार्गावर आहे


कारखाना परिसरात वृक्षारोपण, सुशोभीकरण
मारुती महाराज साखर कारखाना परिसरात कर्मचा-यंच्या वतीने परिसर सुशोभित करण्यात येत असून १००० वृक्ष लागवड करण्यात येत असून संत शिरोमणी मारुती महाराज मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संत मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष श्याम भोसले, प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने