२ लाखाचा गुटखा, ३ लाखाचे वाहन जप्त
जळकोट प्रतिनिधी लातूरच्या अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जळकोट पोलीस ठाण्यासमोरच बंदी असलेला पानमसाला गुटखा व वाहन असा एकूण ५ लाख ८२ हजार ३६० रूपयांचा माल जप्त करून एका विरोधात गुन्हा दाखल केला.
शेख जुनेद हमीद (वय १९) रा. जळकोट रोड उदगीर हा जळकोट पोलीस ठाण्याच्या समोर एम. एच. ०३ - बीएच-४६६४ या क्रमांकाच्या कारमध्ये बंदी असलेला पानमसाला किंमत २ लाख ८२ हजार ३६० रुपये यासह मिळून आला म्हणून अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरून जळकोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा