तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्याने विष घेतले

औसा/प्रतिनिधी-येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सुमारास एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

भागवत उत्तमराव सगर रा. एकंबीतांडा, ता. औसा यांचे या कार्यालयासंबंधी काही तक्रारी होत्या. आपले काम होत नाही या कारणावरून त्याने दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सहाय्यक अधीक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय औसा रत्नमाला ज्ञानेश्वर कातळे यांच्या फिर्यादीवरून शेतकरी भागवत सगर यांच्या विरोधात असा पोलिसांत भादंवि ३०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने