प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे            





 मुरूम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (ता. १८) रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी होते. यावेळी मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, काँग्रेसचे पदाधिकारी राजू मुल्ला, योगेश राठोड, महेश माशाळकर, खद्दे गुरुजी, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांनी केले. सूत्रसंचालन विजया वैष्णव  तर आभार सरस्वती जाधव यांनी मानले. यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने