डॉक्टर्स असोसिएशन द्वारे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 1630 विद्यार्थ्यांचा सहभाग.

  डॉक्टर्स असोसिएशन द्वारे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 1630 विद्यार्थ्यांचा सहभाग







मुरुड/प्रतिनिधी - डॉक्टर्स असोसिएशन मुरुड या संघटनेस यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने मुरुड येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत मुरुड येथील विविध शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील एकूण 1630 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेने सुंदर व आकर्षक रंग देवून चित्रकलेचे कौशल्य दाखविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढोणे साहेब, जनता विद्या मंदिर चे प्राचार्य सुधीर कणसे, डॉक्टर्स असोसिएशन चे सर्व सदस्य, श्री प्रवीण पाटील, श्री अरुण पाटील, श्री वांगस्कर , श्री लांडगे, श्रीमती मते, श्री कोळी इत्यादी च्या उपस्थितीमध्ये प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ. मदन सूर्यवंशी, सहसचिव डॉ. सुमित भोरकर, कोषाध्यक्ष डॉ. कमलदीप कासार, बक्षिसाचे प्रायोजक डॉ. हनुमानदास चांडक, डॉ. बीबी बाहेती, डॉ. संदीप महाजन, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. भालचंद्र दळवे ,डॉ. आनंद चव्हाण, डॉ. विकास काळे, डॉ. सलीम पठाण , डॉ. अमरचंद छल्लाणी, डॉ. सतीश भारती, डॉ. बालाजी सुरवसे, डॉ. नागेश पाटील, डॉ. चंद्रकांत सगर, डॉ. संदीप राजहंस, डॉ. उमाकांत झाडके, डॉ. माळी तिरुमल, डॉ. संतोष गोसावी, डॉ. नितीन ठाकूर, डॉ. बजरंग खडबडे, डॉ. रवींद्र लोमटे, डॉ. पवन मुंदडा, डॉ. योगेश फेरे, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. अमोल टेकाळे इत्यादी डॉक्टर्स मंडळी तसेच डीडीएनएसएफए, मराठवाडा क्रीडा मंडळ, एबीएस ग्रुप, गुंज संस्था व जनता विद्यामंदिर प्रशाला यांच्या सहकार्यातून तसेच सहभागी सर्व विद्यार्थी ,त्यांचे पालक व संबंधित शाळा यांच्या सहभागातून ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे मुरुड डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. दिनेश नवगिरे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने