माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून तुगावकर कुटुंबियाचे सांत्वन

 माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून तुगावकर कुटुंबियाचे सांत्वन


लातूर=लातूर शहरातील पत्रकार हरी तुगावकर यांच्या मातोश्री रमाबाई रामकृष्ण तुगावकर (वय 85 वर्ष) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी उषाकिरण परिसरातील श्रीरंग रेसीडेन्सी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देवून तुगावकर परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.  
यावेळी पत्रकार राम जेवरे यांच्यासह तुगावकर कुटुंबीय उपस्थित होते.  
तसेच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने