माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून बालवाड कुटुंबियाचे सांत्वन

 माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून बालवाड कुटुंबियाचे सांत्वन


लातूर -लातूर शहरातील अशोक मलशेट्टी बालवाड यांचे चिरंजीव नितीन अशोक बालवाड (वय 38 वर्ष)यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या विवेकानंद चौक परिसरातील भारत हौसिंग सोसायटी येथील निवासस्थानी भेट देऊन बालवाड परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी पांडुरंग अशोक बालवाड, अशोक मलरेड्डी बालवाड, अरविंद मलरेड्डी बालवाड यांच्यासह बालवाड कुटुंबीय उपस्थित होते.  
तसेच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने