एच आय व्ही, एड्स जनजागृती अभियान अंतर्गत पथनाट्य चा कार्यक्रम सादर

 एच आय व्ही, एड्स जनजागृती अभियान अंतर्गत पथनाट्य चा कार्यक्रम सादर




औसा: महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्था मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण लातूर यांच्यासह वतीने औसा बस स्थानक येथे एक जनजागृती अभियान अंतर्गत पथनाट्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला सदरील कार्यक्रम हा मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,लातूर यांच्या वतीने सादर करण्यात आला. यावेळी प्राध्यापक रुपेश ठाकूर, शरद काकडे, प्रशांत गीते, संतोष शेटे, विठ्ठल आहेर, यांनी डॉक्टर उषा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम सादर केला असून यामध्ये लोकांच्या मनात असलेल्या शंकाचे समाधान त्याच्या माध्यमातून करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे एस. पी. पाटील, किरण निकम, पंकज सुरवसे, यांची सदरील कार्यक्रमाला उपस्थिती होती या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून,कलाकार आणि त्यांच्या नाटिकाच्या माध्यमातून HIV एड्स संदर्भात सखोल अशी माहिती पटना त्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे.हे कार्यक्रम बस स्थानक येथे संपन्न झाला आहे.
सदरील पथनाट्य हे मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीने सादर करण्यात आले असून, औसा तालुक्यासह चाकूर,निलंगा,किल्लारी अशा विविध तालुक्यांमध्ये सदरील कार्यक्रमा च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती ही देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने