कव्हा येथे शेखमियाँसाहेब दर्गा ऊरूसास संदलने माजी आ.कव्हेकरांच्याहस्ते चादर अर्पण करून प्रारंभ

 कव्हा येथे शेखमियाँसाहेब दर्गा ऊरूसास संदलने माजी आ.कव्हेकरांच्याहस्ते चादर अर्पण करून प्रारंभ


लातूर-लातूर तालुक्यातील कव्हा गाव व परिसरातील सर्वच जाती धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या शेखमियाँसाहेब दर्गा ऊरूसास प्रतिवर्षाप्रमाणे प्रारंभ झाला असून परंपरेप्रमाणे कव्ह्याचे सुपुत्र, भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या घरापासून संदल काढून त्यांच्या शुभहस्ते शेखमियाँ साहेब दर्ग्यास चादर चढवून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ऊरूस (यात्रेस) प्रारंभ करण्यात आला. हा ऊरूस उत्सव दोन दिवस चालणार असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.  
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ऊरूस यात्रेचा प्रथम मान परंपरेनुसार कव्हेकर परिवाराचा असून ही चालत आलेली परंपरा व मान लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आजही कायम सुरू ठेवलेली आहे. सदरील संदल मिरवणूक ही त्यांच्या राजीव नगर येथील त्यांच्या घरापासून मुस्लिम बांधवासह शेकडो सर्वधर्मियांच्या बांधवांना घेऊन पायी चालत वाजत-गाजत, फटाक्याची आतिषबाजी करत शेखमियाँसाहेब दर्ग्यापर्यंत मिरवणूक दग्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.तसेच दर्ग्यावर चादर चढवून या ऊरूस (यात्रेचा) शुभारंभ माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जुने गाव भागातील दर्ग्यालाही त्यांच्याहस्ते चादर चढविण्यात आली.
यावेळी गावचे भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, प्रा.गोविंदराव घार, जेष्ठ नागरिक सुभाषअप्पा सुलगुडले, भागवतराव घार,  विठ्ठलराव घार, भानुदासराव घार, प्रा.अशोक पाटील, सम्राट पाटील, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, अच्यूत पाटील, उपसरपंच किशोर घार, काका घोडके, मनपा माजी स्थायी सभापती असगर शेख, अमर पाटील, हाजी बद्रूद्दिन शेख, पाशाभाई बशीरसाब शेख, कांताप्पा पाटणकर, प्रा.मारूती सूर्यवंशी, माजी सरपंच नेताजी मस्के, राजकुमार थंबा, राहूल पाटील, लक्ष्मण सुर्यवंशी, संतोष जाधव,शिवाजी घार, दिनानाथ मगर, नामदेव मोमले, गोपाळ सारगे, शिवशरण थंबा, सचिन घार, प्रशांत पाटणकर, नाना घार,अच्युत खंडागळे, सूर्यकांत होळकर, बापू खटके, समशोद्दिन शेख, समद शेख, खाजा सय्यद,अशोक खंडागळे, तुकाराम घार, अमर सारगे, गोविद सोदले, परमेश्‍वर खंडागळे, गणेश घार, सदाशिव सारगे, गोरख सारगे, बशीर शेख, चद्रकांत इरपे,सपंत सारगे, संतोष जाधव, कोंडीबा दुनगावे, मैनोद्दिन शेख, भागवत सूर्यवंशी, विजयकुमार पाटील, भारत घार, तय्यब पठाण, तानाजी पांचाळ,  सुनिल हांडे, मुस्तीन पटेल, व्यंकटेश मामडगे, संतराम सूर्यवंशी, बाळू बोयणे, जाफर सय्यद, जलील शेख रशीद शेख, शेख पाशा, रफीक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने